अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदी किरण गोफणे यांची निवड करण्यात आली असून, गुरुवारी (21 एप्रिल) झालेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या आढावा बैठकी दरम्यान त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी रासपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल पक्षाच्या ध्येय धोरणाद्वारे पक्षातील कार्याच्या विश्लेषणावर अवलंबुन असून त्यांची निवड पक्षाच्या घटनेनुसारपुढील वर्षासाठी करण्यात आली आहे.
या निवडी संदर्भात बोलताना किरण गोफणे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर व रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांची विचारसरणी व सत्य शोधन ! समाज प्रबोधन ! राष्ट्र संघटन या पक्षाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे पक्षाचा विचार सर्व समाजातील, सामान्यांपासून ते उच्च पदापर्यंत पोहोचवण्याचा व पक्षाचे कार्य जोमाने प्रामाणिक वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात पक्षाला यशस्वी करून आपली निवड सार्थ ठरवणार असल्याचे म्हटले आहे.