अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर सायबर क्राईम व ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी – आदि.कविता निरगुडे

कर्जत(वार्ताहर): अंगप्रदर्शनाच्या अश्लील व्हिडिओद्वारे आदिवासी समाजाची बदनामी करणार्‍या व समाजात तेढ निर्माण करणार्‍या अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर सायबर क्राईम व ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी आदिवासी महिला समाजसेविका आदि.कविता निरगुडे यांच्यासह विविध आदिवासी संघटनांनी केली आहे.

अभिनेत्री राखी सावंत यांनी आमच्या आदिवासी समाजाला उद्देशून अश्लील अंगप्रदर्शन कृती करत,व्हिडिओ बनवून विराल भयानी या नावाच्या आयडीवर इंस्टाग्रामवर व व्हॉटस्‌ऍप अशा सोशल मीडियावर टाकत आमच्या आदिवासी समाजाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ,संताप निर्माण होईल, यासाठी आक्षेपार्ह वाईट कृती, विक्षिप्त व अश्लील हावभाव, अश्लील शब्दप्रयोग करून आमच्या दिनदलित आदिवासी समाजाची जाणीवपूर्वक बदनामी केली आहे.

या समाजविघातक कृतीमुळे अभिनेत्री राखी सावंत यांच्या विरोधात सायबर क्राईम व (ऍट्रॉसिटी) अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून,त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आमच्या विविध आदिवासी संघटना,आदिवासी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल.अशा आशयाची आदि.कविता निरगुडेसह विविध आदिवासी समाजसंघटनानी निवेदने सादर केली.

सदरचे निवेदन राज्यपाल, गृहमंत्री व कर्जत/अंबरनाथचे तहसिलदार, पोलीस अधिक्षक ठाणे/रायगड व पोलीस आयुक्त ठाणे/रायगड यांना दिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!