बारामती(वार्ताहर): पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शाखा काळेगनर व बारामती नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांच्या वतीने इफ्तार पार्टी व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
काळे कुटुंबियांचे सर्व जातीधर्मातील लोकांशी असलेले अतुट असे नाते व जातीय सलोखा अबाधीत राहावा. सर्वधर्म समभाव हा उद्देश ठेवून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले हेाते.
यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, बा.न.प. शिक्षण मंडळाचे माजी सभापती कमरुद्दीन सय्यद, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, मा.नगरसेवक अनिल कदम, मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, पत्रकार तैनुर शेख, मन्सूर शेख, ऍड.सोहेल शेख, इम्रान पठाण, जमीर इनामदार, अमीर झारी, सलीम शेख, इरफान शेख इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इम्राण पठाण व मकसद ग्रुपचे अमीर झारी यांच्या वतीने सत्यव्रत काळे यांचा शाल देवून सत्कार करण्यात आला.