बारामती(वार्ताहर): नुकत्याच पुणे येथे झालेल्या पुणे जिल्हा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कूलच्या क्रीडा शिक्षिका सौ.आरती वैभव एकाडपाटील यांनी 189.5 किलो वजन उचलून मास्टर-1 या ग्रुपमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत कास्य पदक व प्रमाणपत्र प्राप्त केले. अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष मिलिंद शहा, प्राचार्य राखी माथुर व समन्वयक स्मिता ढवळीकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन व कौतुक केले.