बारामती(वार्ताहर): येथील दरवर्षीप्रमाणे उघडा मारूती तरुण मंडळच्या वतीने हनुमान जयंती उस्तव साजरा करण्यात येतो. यावर्षी हनुमान मुर्तीची महाआरती व अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम बा.न.प.चे मा.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी बा.न.प.चे मा.नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, मा.उपाध्यक्ष अभिजित जाधव, मा.नराध्यक्षा भारती मुथा व मा.नगरसेवक सुधीर पानसरे, उतम धोत्रे, राकेश वाल्मकी, शिवाजी पवार, सेवाग अहिवळे, बलवंत माने, किशोर भोसले, अमोल शिंदे, सुरज दवकाते, अमित लालबिगे, संदिप जेधे, आयोजक उघडा मारूती तरुण मंडळचे संस्थापक व मा.नगरसेवक कुंदन लालबिगे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.