बारामती(वार्ताहर): पंजाब येथे नुकत्याच झालेल्या कुस्ती प्रशिक्षणात सर्वात मोठी समजली जाणारी एनआयएस या पदवी परीक्षेत पै.सागर माने यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. बारामती तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पै.सुधाकर माने यांचे चिरंजीव आहे.
नुकतीच भारतीय खेळ प्राधिकरण नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था पटियाला पंजाब येथे कुस्तीविषयक अभ्यास कोर्स घेण्यात आला.

पै.सागर माने यांनी खडतर आव्हाने पार करत आपण उत्तीर्ण झाला व बारामतीकरांना अभिमान वाटेल असा प्रवास केला. बारामतीनगरीच्या कुस्ती क्षेत्रात त्यांनी खर्या अर्थाने मानाचा तुरा रोवला गेला. नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ स्पोर्टसची एनआयएस ही मानाची समजल जाणारी कुस्ती प्रशिक्षक पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
लहानपणापासुनच लाल मातीवर प्रेम करणारा, अनेक नामवंत कुस्ती आखाडे गाजवणारा, अतिशय मितभाषी, आणि कुस्तीसाठी अहोरात्र झटणारे नामांकित कुस्ती मल्ल व उत्कृष्ट पंच म्हणुन आपला ठसा उमटवणारे पै सागर माने आपण पंजाब येथे उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल समस्त कसबा, बारामतीकर व सर्व कुस्ती प्रेमींकडुन त्यांचे कौतुक होत आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.