बारामती नगरपरिषदेचा ना-हरकत दाखला नसताना निवासी झोनमध्ये इंडस टॉवरची उभारणी : क्षेत्रिय अधिकार्‍याने गुन्हा दाखल करण्याची मागणी

बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेने ना-हरकत दाखला दिलेला नसताना सुद्धा चंद्रमणीनगर आमराई येथील निवासी झोनमध्ये राजरोसपणे इंडस टॉवरची उभारणी सुरूच आहे. क्षेत्रिय अधिकार्‍याने संबंधित जागा मालक व इंडस टॉवर लिमिटेडवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सोसायटीच्या जागेत इंडस टॉवर लिमिटेड टॉवर उभारीत असल्याच्या विरोधात सर्वोदयनगर, चंद्रमणीनगर येथील स्थानिक नागरीकांनी आवाज उठविला आहे. या नागरीकांनी नगरपरिषदेसह महावितरणचे अति.कार्यकारी अभियंता बारामती शहर उपविभाग यांना सुद्धा लेखी निवेदन सादर केले आहे.

अति.कार्य.अभियंता यांनी विधी अधिकारी यांना लेखी पत्र काढून याबाबत मार्गदर्शन होणेबाबत कळविले आहे. या पत्रात इंडस टॉवरने 60 दिवसात बारामती नगरपरिषदेचा ना-हरकत दाखला सादर करतो म्हणून सांगितले होते मात्र, आज तगायत कार्यालयात कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र सादर केले नसलेबाबत विधी अधिकारी यांना कळविले आहे. त्यामुळे लवकरच या टॉवरसाठी दिलेला वीज जोड तोडण्यात येणार की नाही हे कळणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने टॉवर उभारणीसाठी नविन प्रचलित नियमावली केलेली असताना, काही कंपन्या मनमानेल त्याप्रमाणे काम करताना दिसत आहे. टॉवर उभारणीसाठी विविध ना-हरकत दाखले घेणे गरजेचे असताना, बारामती नगरपरिषदेने कोणतेही नाहरकत दिलेले नसताना आज काम जर पूर्णत्वाकडे जात असेल तर यास संबंधित क्षेत्रिय अधिकारी यास जबाबदार असल्याचे नागरीकांमध्ये बोलले जात आहे. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने जारी केलेलया शासन निर्णयानुसार क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या व पर्यवेक्षकाच्या नियुक्त्या केलेल्या असताना त्यांना दिलेल्या जबाबदार्‍या जर पार पाडीत नसतील तर याला कोण जबाबदार असा खोचक प्रश्र्न नागरीकांना पडलेला आहे. सदर इंडस टॉवरला नगरपरिषदेने ना-हरकत पत्र दिल्यास काही स्थानिक कार्यकर्ते उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!