बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये मोटरसायकली, चारचाकी वाहने जप्त आहेत तर काही वाहने बेवारस म्हणून जप्त आहेत.
मुख्यत्वेकरून गुन्हे करताना आरोपींकडून वाहनांचा मोटरसायकलचा वापर होतो व ती वाहने पोलीस जप्त करता. या प्रकारच्या वाहनावरील भौतिक दुवा गोळा करून पोलीस रासायनिक विश्लेषण तज्ञाकडे पाठवतात. सदरची वाहने परत मिळावी म्हणून आरोपी वाहनांचे कागदपत्रे सादर करून कोर्टाला सदर वाहने मोटरसायकली परत मागू शकते स्पोर्ट त्याला योग्य त्या अटी घालून ती वाहने परत करतात. तरी ज्यांची अशा प्रकारे वाहने जप्त आहेत ते विनाकारण खराब होऊन जातात तरी त्याबाबत संबंधित कोर्टामध्ये आपण अर्ज करून सदर वाहन परत मिळण्याबाबत प्रयत्न करावेत. तसेच चोरीला गेलेल्या मोटरसायकली पोलिसांनी जप्त केले आहेत परंतु मूळ मालकांनी त्या अद्याप पर्यंत घेऊन गेलेले नाहीत तरी ज्यांची वाहने जप्त आहेत त्यांनी गाडीचे कागदपत्र घेऊन येऊन पोलिसांकडून किंवा न्यायालयात अर्ज करुन सदर वाहने घेऊन जावेत.
तसेच मोटार वाहन अपघात किंवा पोलिसांना मिळालेली बेवारस वाहने पोलीस ठाणे आवारात आहेत त्यांची कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी ती परत केली नाही तरी ज्यांची वाहने अशाप्रकारे जप्त आहेत त्यांनी कोणताही मालकी हक्काचा पुरावा घेऊन यावा त्याला त्याचे बेवारस जप्त वाहन परत केले जाईल.
तरी सर्व जनतेला आव्हान आहे ज्यांची वाहने जप्त आहेत त्यांनी न्यायालयात अर्ज करून किंवा पोलिसांना गाडीची कागदपत्रे सादर करून सदर वाहने परत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. कायदेशीर प्रक्रियेमध्ये पोलिसांतर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. पोलीस ठाण्यात सदरचा मुद्देमाल विनाकारण पडून राहिल्याने त्याला गंज पकडतो व वाहनांचे नुकसान होत आहे. व पोलिस ठाण्याची सुद्धा खूप जागा त्यामुळे अडवली जात आहे. याबाबत कुणाला अडचण आल्यास पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर किंवा पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्याशी डायरेक्ट संपर्क करावा.