अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): गेल्या 19 वर्षात विरोधकांना शेटफळगळे ग्रामस्थांनी भरभरून मतदान करून मंत्री केले. यांनी गावात काय काम केले? पूर्वी एक दोन लाखाचे काम जरी मंजूर झाले तरी त्याची दोन-तीन वेळा उद्घाटने केली. दोन लाखाच्या कामात दोन लाखाचा खर्चच झाला असल्याची टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे गावात आणि पंचक्रोशीती 63 कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन शुक्रवारी दि.15 एप्रिल रोजी मंत्री भरणे यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी जाहिर सभेला संबोधन करताना बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, पंचायत समिती सदस्या शीतलताई वणवे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, युवा नेते दीपक जाधव, कार्याध्यक्ष अतुल झगडे, वरकुट्याचे सरपंच बापूराव शेंडे, छत्रपती कारखान्याच्या संचालिका नंदाताई वाबळे, सुमनताई दराडे, बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, संतोष वाबळे, छत्रपती कारखान्याचे संचालक निवृत्ती सोनवणे, अनिल बागल, युवकाध्यक्ष ऍड.शुभम निंबाळकर यांसह विविध गावचे सरपंच पदाधिकारी व ग्रामस्त उपस्थित होते.
भरणे पुढे म्हणाले की, विकास माझ्या रक्तातचं आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याला विविध विभागाचा निधी कसा मिळेल यासाठी माझी धरपड असते. मात्र माझ्यावर खोटेनाटे आरोप केले जातात. राजकिय स्वार्थासाठी नांवे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. नागरिकांनी येणार्या निवडूकीत तुम्ही आमच्या गावासाठी काय केले याचा विरोधकांना जाब विचारावा. त्यांनी जर तुमच्या प्रश्नाचे समाधान केले तर ठिक आहे परंतु 2024 मध्ये तालुक्याचा इंदापूर शहरासह शेटफळगढे गावचा कायापालट झाला नाही तर मी मत मागायाला ही तुमच्या दारात येणार नाही असा विश्वास राज्यमंत्री भरणे यांनी व्यक्त केलाय.
मला माहित नव्हते की या देशाचा नेता माझ्या कामाची एवढी मोठी नोंद घेईल आणि केलेल्या कामाची यादीच सर्वांना वाचून दाखवील आज मी मंत्री असलो तरी मला याचा मोठेपणा नाही. या तालुक्यातील गोरगरीब माणसाच्या कामासाठी या राज्यातला कुठलाही एखादा माझ्यापेक्षा मोठा जेष्ठ मंत्री असेल मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील माझ्या तालुक्यातील गोरगरीब माणसासाठी पुढच्या माणसाच्या पाया पडण्याची वेळ जरी आली तरी मी त्याच्या पाया ही पडेल पण इंदापूर तालुक्यात निधी आणण्याचा प्रयत्न करेल.
19 वर्षात विरोधकांना नागेश्वराचे मंदीर का दिसले नाही? मी आमदार असताना सांगितले होते की या कामासाठी निधी देईल तो शब्द पाळतो म्हणत भरणे यांनी नागेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी तात्काळ आमदार फंडातून 25 लाख रुपयाचा निधी देत असल्याची घोषणा केली.
लोकांचे अडचणी समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे लोकप्रतिनिधीचे काम असते. जी कामे सहज शक्य आहेत ती तात्काळ केली जातील. मात्र जी अडचणीची आहेत ती टप्प्याटप्प्याने मार्गी लावू 2019 च्या विधानसभेला शेटफळगळे मधून किती मते कमी मिळाली याचा उहापोह करण्यात अर्थ नाही आता भविष्याचा विचार करु शेटफळगढे गांव हे कोपर्यातील गाव आहे. मी आमदार असताना देशाचे नेते शरद पवार यांनी या गावाला भेट दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून या गावात विकासाची कामे झाली. शेटफळगढे पंचक्रोशीतील जुना पाझर तलावाच्या करीता 8 ते 9 कोटी रूपयाचे इस्टीमेट केले असून येणार्या दोन महिन्यात त्यास मंजुरी मिळेल.
इंदापूर तालुक्याच्या पाश्चिम भागात शेटफळगळे परिसरात 63 कोटी रुपयांची विकासकामे होत असून हा भरघोस निधी मंत्री भरणे याच्या माध्यमातून आहे. आजपर्यंत असा भरीव निधी या भागात आला नव्हता त्यामुळे 1 कोटीवर किती शून्य असतात हे विरोधकांना विचारावे लागेल अशी खरमरीत टीका माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यानी शेटफळगळेत केली आहे. तालुक्यात चौफेर विकास करण्याचे काम मंत्री दत्तात्रय भरणे करीत आहेत. गेल्या वीस वर्षांचा इतिहास पाहिला तर हे स्पष्ट दिसून येते. फक्त भूलथापा गोडबोलून मत मिळवणे आणि एका बाजूला चोवीस तास जनतेची सेवा करणे असे दोन पर्याय आपल्यासमोर होते. भविष्यात ही त्याच ताकदीने त्यांच्या पाठीमागे आपण उभे राहिले पाहिजे असे ही ते म्हणाले,
आमचं चुकलं आम्ही आधी इंदापूरला गेलो आणि… आमचे सत्तावीस कोटी रूपये बुडाले….
एका वर्षात जर एका गावाला 27 कोटी रुपये निधी मिळाला. असेल तर या गावाचे भाग्य समजावे लागेल शेटफळगढेचे सरपंच नशीबवान आहेत तुम्ही इदापूरला न येता भरणेवाडीला गेला आणि गावच्या विकास कामांसाठी तुम्हाला सत्तावीस कोटी रुपये निधी मिळाला आमचे चुकलं आम्ही आधी इंदापूरला गेलो आणि नंतर इकडे आलो त्यामुळे आमचे सत्तावीस कोटी रूपये बुडाले असे वरकुटे खुर्द में सरपंच बापूराव शेंडे यांनी म्हणताचं सर्वत्र हशा पिकला,मामांकडे सर्वात मोठे देणे आहे जे ते तालुक्यासाठी देत आले आहेत. वडीलकीच्या नात्याने आपण वडिलांकडे जसा हट्ट करतो त्या पद्धतीने मामा ज्या गावात जातात त्या गावातीन लहान थोरांपासून अगदी महिलांवर्गापर्यंत सर्व मामाकडे हट्ट धरतात का? कारण हट्ट पुरवणारा मामा आपल्याकडे आहे. याचा विश्वास त्यांना आहे. शेटफळगढेला एका वर्षात 27 कोटी दिले आहेत पुढील पंचवीस वर्षे आपल्याला असेच पैसे मागायचे आहेत त्यासाठी मदतानरूपी आशिर्वाद द्या येणारा काळ हा उज्ज्वल असेल असे म्हणत मंत्री दत्तात्रय भरणे हे भविष्यात निर्विवाद पणे तालुक्याचे लोकप्रतिनिधी राहतील असा विश्वास युवा नेते माजी अध्यक्ष दीपक जाधव यांनी व्यक्त केला.