बारामती(वार्ताहर): राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त स्वातंत्रसैनिक नगरभूषण क्रांतिसिंह विश्र्वनाथ (दादा) गालिंदे चौक प्रतिष्ठानच्या वतीने 131 किलो जिलेबी वाटप केल्याने या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संदेश (बॉस) गालिंदे, गणेश (काका) गालिंदे, सुमित (दादा) गालिंदे, श्रेणिक (भाऊ) गालिंदे, श्रीकांत (आण्णा) गालिंदे , गोकुळ भाऊ गालिंदे , चैतन्य (भैय्या) गालिंदे, अभय (पप्पु) गालिंदे , योगेश (भैय्या) गालिंदे, गौरव दादा गालिंदे, पवन (शेठ) गालिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यक्रम पार पडला.

स्वातंत्रसैनिक नगरभूषण क्रांतिसिंह विश्र्वनाथ (दादा) गालिंदे चौक प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. विविध महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नैसर्गिक आपत्तीमध्ये दहिहंडी उत्सवाचा खर्च टाळून कोल्हापूर, सांगली येथील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली होती.
1942 च्या क्रांतीमध्ये बारामती मधील खाटीक समाजाचे धडाडीचे शिलेदार म्हणुन गालिंदे-इंगुले कुटुंबाकडे पाहिले जाते. यामध्ये कै.विश्र्वनाथ मा.गालिंदे, कै.संभाजीराव गालिंदे, कै.उद्धवराव इंगुले, कै.सदाशिवराव गालिंदे, कै.विश्र्वनाथ इंगुले, कै.लक्ष्मणराव इंगुले, कै.बाबुरावजी इंगुले, कै.प्रल्हाद इंगुले यांच्या नावाचा समावेश आहे. या थोर क्रांतीकारी मंडळींनी केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून स्वातंत्रसैनिक नगरभूषण क्रांतिसिंह विश्र्वनाथ (दादा) गालिंदे चौक प्रतिष्ठान समाजात कार्य करीत आहे.