बेस्ट रिकव्हरी फेब्रुवारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडीले, देवकर, सुनील कोठे, कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण यांचा सत्कार
बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीसांनी शहरात बंद घरे फोडून लूट करणार्या टोळीचा छडा लावल्याने 7 लाख 20 हजार 300 रुपये किंमतीचा व 177 ग्रॅम 17 तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश आले आहे. यामुळे गेल्या 4 महिन्यांत बारामती शहरात एकही घरफोडी झाली नाही. याबाबत 15 एप्रिल 2022 रोजी पोलीस अधीक्षक पुणे यांनी क्राईम मिटींगमध्ये शहर पोलीस पथकाचा बेस्ट रिकव्हरी फेब्रुवारी म्हणून बक्षीस दिले व त्यांचा सत्कार केला.
बारामती शहरांमध्ये बंद घरे फोडून लूट करून चोर्यांचे प्रमाणात झालेली वाढ पाहता पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हे उघड करणेबाबत दिलेल्या आदेशाबरोबर या प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती काढून तपास करावयाच्या सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडीले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार अभिजीत कांबळे, संजय जाधव, संजय जगदाळे, रामचंद्र शिंदे, कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, अंकुश दळवी, रणजीत देवकर, दशरथ इंगोले, अजित राऊत असे तपास पथक तयार करून या प्रकारचे गुन्ह्याचे पद्धतीचा अभ्यास करून शेजारील जिल्ह्यातील आरोपींची माहिती घेतली असता आरोपी नामे लोकेश रावसाहेब सुतार (वय-28 वर्षे, राहणार लिंगनूर ता.मिरज जि.सांगली) हा कळंबा कोल्हापूर येथील जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असून त्याची पद्धत याच प्रकारे गुन्हे करण्याची असल्याने व तो अट्टल घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी असल्याने त्यास बारामती शहर पोलीस स्टेशन ने ताबा वारंट ने आणून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण रीतीने समांतर चौकशी तपास केला असता सदर आरोपीने त्याचा साथीदार संदीप यशवंत पाटील (रा.लिंगनूर, ता.मिरज, जि.सांगली) याच्यासह बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्व दिवसा घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे सदर आरोपी यांचेकडून खालील गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
गुन्हा रजिस्टर नंबर 147/2021 भादवि कलम 454,380 या गुन्ह्यातील
1) 90 हजार रूपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण
2) 25 हजार रूपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दोन अंगठ्या
3) 12 हजार 500 रूपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे खड्याचे कानातले
गु.र.नं 450/2021 भादवि 454 380
1) 1 लाख 10 हजार रूपये किंमतीचा पावणेतीन तोळे वजनाचा सोन्याचा राणी हार
2) 1 लाख 50 हजार रूपये किंमतीचा 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे साखळीचे गंठण
3) 1 लाख 40 हजार रूपये किंमतीचा 35 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणी हार
गु.र.नं 752/2021 भा.द.वि. 454,380
1) 56 हजार रूपये किमतीचे 14 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस
2) 34 हजार 200 रूपये किंमतीचे नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील फुले
3) 1 लाख 26 हजार रूपये किंमतीचे 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण
बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नागरीकांना जाहिर आवाहन :-
बारामती शहर पोलीस ठाणे महिलांचे बचत करून खरेदी केलेले श्रीधन दागिने जप्त केल्याने यातील फिर्यादी यांचे चेहर्यावर समाधान दिसून येत आहे तसेच यापुढे सर्व बारामतीकरांना विनंती आहे की आपले घर व दरवाजाला मजबूत कुलूप लावा लोखंडी ग्रील बसून घ्या तसेच आपले घराजवळ अगर सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसून घ्या शक्यतो दागिने लॉकरमध्ये मध्ये ठेवा कारण किमती वस्तू ची सुरक्षितता पाहणे हे धारकांचे प्रथम कर्तव्य आहे नाही तर मनस्ताप वाट्याला येतो पोलीस तर त्याचे काम कौशल्याने करून तपास करणार आहे तरी सदर बाबत सर्व बारामतीकरांनी खबरदारी घेणे.