अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): जंक्शन येथील सामाजिक कार्यकर्ते संभा बनसोडे परिवाराच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नील ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील हे होते. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुष यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील व बुद्ध पुजा करण्यात आली.
यावेळी गणेश इंगळे व श्रीकांत पाटील यांनी मोलाचे समाजप्रबोधनपर मार्गदर्शन केले. वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.लातुरे उपस्थित होते.
पुष्पगुच्छ व संविधान प्रत भेट देवून उपस्थित पाहुण्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी वसंत आबा मोहोळकर, सागर मिसाळ, ऍड.नितीन कदम, प्रताप मोहोळकर, बाबासाहेब जठार, बाबासाहेब होळ, विशाल बनसोडे व विजय बनसोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.