अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जीवनाची मुलभूत तत्व मान्य करणारी पद्धती म्हणजे सामाजिक लोकशाही असा संदेश देणारे राज्यघटनेचे शिल्पकार युगपुरूष, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 131 व्या जयंती महोत्सव ग्रामपंचायत गोतंडी याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथमत: तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

यावेळी गोतोंडी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे, माजी सरपंच काशिनाथ शेटे, परशुराम जाधव, आप्पा पाटील, पोपट नलवडे, हरीभाऊ खाडे पाटील,भारत साहेब, अनिल खराडे, अरुण नलवडे, कुंडलिक नलवडे, रवी कांबळे, पोपट कांबळे, नितीन कांबळे,सौरभ अर्जुन,भैया बिबे, छगन शेंडे, डॉ.सुरेश कांबळे, आबा मारकड,विकास कांबळे, सतीश कांबळे, नागनाथ अरुण कांबळे,नागनाथ ज्ञानदेव कांबळे, महेश पवार, बापू पिसे, प्रकाश मोरे इ. मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.
काशिनाथ शेटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बाबासाहेबांनी कुठल्याही जाती-पातीच राजकारण केले नाही. सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. त्यांचे विचार तरुण पिढीला प्रेरणादायी आहेत. तसे जयंतीनिमित्त शुभेच्छा देत देशाची राज्यघटना भारतीय रिझर्व बँकेची स्थापना तसेच, सर्व क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे असून देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी आहे.