अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): पिंपरी खुर्द शिरसोडी गावच्या विकासासाठी मी पूर्णपणे झोकून काम करणार असून राज्याचे विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली आमचे गाव विकासाचे एक मॉडेल बनेल असे काम करणार असल्याचे मत उपसरपंच वैशालीताई सुनिल मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील पिंपरी (खुर्द) शिरसोडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशालीताई सुनील मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आली. यांचा सत्कार इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. याप्रसंगी सौ.मोहिते-पाटील बोलत होते.
वैशालीताई सुनील मोहिते पाटील या राज्याचे विद्यमान राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांचे खंदे समर्थक असून त्यांच्या या निवडीने पिंपरी (खुर्द) शिरसोडी पंचक्रोशीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सदर सत्कार यावेळी नवनाथ (आबा) रुपनवर, नानासाहेब भोईटे, संजय देवकर, सुभाष ढरंगे ,सोमनाथ जावळे, रमेश पाटील, बोबडे महाराज, प्रफुल्ल पवार, शिवाजी बोबडे, रमेश भोसले, विठ्ठल महाडिक, अक्षय कोकाटे, गोविंद पाडुळे, सचिन खामगळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.