अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या विविध विकासकामांकरीता तब्बल 4 कोटींहून अधिकचा निधी मंजूर करून पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने समस्त मुस्लिम बांधवांना अनोखी भेट देऊन रमजान महिन्याच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन यापुढील काळातही भरघोस निधी देणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय (मामा) भरणे यांनी मुस्लिम बांधवांना दिली.
पवित्र रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना अनोखी भेट दिल्याने इंदापूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने भरणेवाडी येथे जाऊन राज्यमंत्री नामदार श्री भरणे मामा यांचा भव्य पुष्पहार घालून आभार मानत आनंद व्यक्त केला.

यावेळी इंदापूर शहरासह तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या मशिद सुशोभीकरण,शादिखाना,ईदगाह मैदान,रस्ते, दफनभूमी याकरीता 4 कोटी मंजूर करण्यात आल्याचे नामदार श्री भरणे मामा यांनी सांगून यापुढील काळातही विविध विकासकामांकरीता आणखीचा भरीव निधी मंजूर करणार असल्याची ग्वाही नामदार श्री भरणे मामा यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांसमोर दिली.
पन्नास वर्षांहून अधिक काळापासून रखडलेल्या मुस्लिम बांधवांच्या विकासकामांकरिता नामदार श्री भरणे मामा यांनी भरघोस निधी मंजूर करून प्रमाणिकपणे मुस्लिम समाजाला न्याय दिल्याची भावना उपस्थित मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली.या सत्काराप्रसंगी इंदापूर तालूका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष ईक्बाल शेख, मा.अध्यक्ष तय्यब शेख,जेष्ठ मार्गदर्शक शब्बीरभाई काझी, रियाज शेख, रफिक शेख,आफाक मुलाणी,इन्नुस शेख,मुस्तफा शेख,आयुब सय्यद, आजिज मुलाणी, शब्बीर शेख, समीर शेख,अस्लम मुलाणी,अमीन मुलाणी,अमीन मुल्ला सर यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.