अशोक घोडके यांजकडून…
इंदापुर(वार्ताहर): येथील निमगाव केतकी येथे रविवार दि.10 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6 वा. नवी पेठ या ठिकाणी 21 कोटी 41 लक्ष विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. याचठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांच्या अथक प्रयत्नातून इंदापूर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलत चाललेला आहे. कोट्यावधी रूपयांची विकास कामांमुळे नागरीकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाअध्यक्ष प्रदिप (दादा) गारटकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रताप पाटील, प्रवीण (भैय्या) माने, हनुमंतराव कोकाटे, श्रीमंत ढोले, स्वातीताई शेंडे, दीपक (भाऊ) जाधव, सचिन सपकळ, अभिजीत तांबिले, प्रशांतबापू पाटील, अतुल झगडे, डी एन जगताप, गणेश झगडे, डॉक्टर शशिकांत तरंगे, ऍड.लक्ष्मण शिंगाडे, राजेश जामदार, दत्तात्रय फडतरे, अमोल पाटील, शिवाजी इजगुडे, महारुद्र पाटील, छायाताई पडसळकर, शुभम निंबाळकर, बाळासाहेब करगळ, सतीश पांढरे, कालिदास देवकर, बाळासाहेब ढवळे, अशोक चोरमले, हामा पाटील सचिन खामगळ, वीरसिंग रणसिंग, धनंजय पाटील, अभिजीतभैय्या रणवरे, सोमेश्वर वाघमोडे, सागर मिसाळ, अमोल भिसे, सुनील खामगळ, पैलवान कुंडलिक कचरे, एडवोकेट तेजसिंह पाटील, समीर भैया मोरे, रहनाताई मुलानी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी मार्गदर्शन दशरथ (तात्या) डोंगरे, दत्तात्रय (भाऊ) शेंडे, मच्छिंद्र (आप्पा) चांदणे, संदीप (नाना) भोंग, अतुल (आप्पा) मिसाळ, भारत (दादा) मोरे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच प्रवीण भैय्या डोंगरे, उपसरपंच मीनाताई दीपक भोंग, ग्रामपंचायत सदस्य – अजित मिसाळ, अनुराधा जगताप, सचिन चांदणे, तात्यासाहेब वडापुरे, मधुकर भोसले मनिषा बारवकर, अलकाताई भोंग, अमोल हेगडे, कमल राऊत, सायली मिसाळ, ग्रामसेवक – अमोल मिसाळ व ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी निमगाव केतकी यांनी केले आहे.