बारामती(वार्ताहर): येथील केएसीएफ इंग्लिश मेडियम स्कूलच्या समोर भारत सीएनजी प्लँटचे उद्घाटन बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्या शुभहस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.
यावेळी मा.नगरसेक सुरज सातव, मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, अविनाश रणसिंग, काका सातव, कमरूद्दीन सय्यद इ. मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

बारामतीत भव्य प्रशस्त जागेत सीएनजी सिलेंडर हायड्रो टेस्टिंगसाठी यापुढे पुण्याला जाण्याची गरज नाही. 2 तासात सिलेंडर टेस्ट करून मिळणार असल्याचे भारत सीएनजीचे डायरेक्टर इम्रान सादीक मोमीन यांनी यावेळी सांगितले.
सकाळी 10 ते सायं.6 वाजेपर्यंत सीएनजी ग्राहकांसाठी सेवा उपलब्ध असणार आहे. यावेळी मोमीन समाजाचे पदाधिकारी, मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.