दौंड(वार्ताहर): भारतीय पत्रकार संघाचे 27 राज्यामध्ये काम सुरू असल्याचे प्रतिपादन पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ऍड.कैलास पठारे यांनी केले.
दौंड शहर व तालुका कार्यकारणी पदग्रहण समारंभ प्रसंगी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना श्री.पठारे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे, उपाध्यक्ष तैनुर शेख, जिल्हा सचिव सिकंदर नदाफ, बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, पुरंदर तालुका अध्यक्ष संदीप बनसोडे, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, संघाचे कायदेशीर सल्लागार ऍड.योगेश तुपे, इ. मान्यवर उपस्थित होते.
दौंड पंचायत समिती सभागृह याठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दौंड तालुका अध्यक्षपदी सुभाष कदम यांची नियुक्ती करण्यात आली. दिनेश पवार यांची संघाचे जिल्हा प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली. यावेळी रमेश लेंढे, तैनुर शेख, शहाजी गोसावी, सिकंदर नदाफ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुभाष कदम यांनी केले. सुत्रसंचालन दिनेश पवार यांनी तर आभार दौंड तालुका उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी मानले.