बारामती(वार्ताहर): प्रत्येक समाजात कट्टरवादी लोकं असतात, समाजावर येणार्या प्रत्येक संकटाला जीव ओतून काम करणारे कट्टर कार्यकर्ते असतात अशा युवा कार्यकर्त्यांमधून सुद्धा मनसेचे राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत शांतता राखण्याचा संदेश देण्यात आला आहे.
मुस्लिम समाजातील युवक सामाजिक कार्यकर्ते व मकसद युथ फौंडेशनचे अध्यक्ष अमीर शेख यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे की, मशिदीच्या आजान भोंग्यापासुन फक्त काही जातिवाद्याना त्रास आहे. ऊगाचं कुठला भामटा काय बोलुन जाईल या वर लक्ष देऊ नका हे एक रमजान महिन्यात षडयंत्र रचण्याचे काम सुरू आहे. मुस्लिम बांधव दिवसभर रोजे करतात, स्वत:ची चिडचीड करून घेऊ नका असे भामटे बोलणारे भरपूर आहेत. यांनी बोलण्याने काय फरक पडणार आहे का? फक्त समाजा समाजात विष पसरवण्याचं काम चालु आहे. द्वेष, मत्सर पसरून देशविघातक कृत्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वक्तव्याला भीक घालु नका असेही आवाहन अमीर शेख यांनी केले आहे.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवरून कट्टरवाद्यांना सुद्धा कळून चुकले आहे की, एकमेकांची डोके भडकवून स्वत:ची पोळी भाजणारे काही राजकीय मंडळी आहेत त्यामुळे यापुढे असे भडकावू वक्तव्याला कोणीही भीक घालणार नाही हे यामधून दिसून आले आहे. सर्वस्तरातून कडव्या प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आलेल्या आहेत.