बारामती(वार्ताहर): क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त व विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामतीच्या वतीने प्रथमत: विनम्र अभिवादन! समता सैनिक दलाची मानवंदना गुरूवार दि.14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8.30 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बारामती याठिकाणी होणार असल्याचे शाखा अध्यक्ष बापूराव लोंढे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेरीत ग्रामीण भागात शिस्त व नियोजनबद्ध मिरवणुकीसाठी समता सैनिक दलाचे सैनिक उपलब्ध होणार आहे तरी शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
भारतीय बौद्ध महासभा तर्फे 9 मे ते 18 मे 2022 या कालावधीत श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, इंदापूर रोड, बारामती याठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
तरी इच्छुकांनी भारतीय बौद्ध महासभा बारामती शाखेशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी अध्यक्ष-बापूराव लोंढे (9356242662), सचिव-ऍड.किशोर मोरे (9657865318),कोषाध्यक्ष- भारत लोंढे (9763770057), संस्कार उपाध्यक्ष-गोरख कांबळे (9623162371), संरक्षण उपाध्यक्ष-राजु मोरे (9665154769), पर्यटन उपाध्यक्ष-बाळासाहेब लोंढे ( 8208695361), कंपनी कमांडर-पुण्यशिल लोंढे (9604644262), सोमनाथ लोंढे (9960308903), महिला उपाध्यक्ष-रत्नमाला लोंढे (9403357729), अस्मिता शिंदे-(9604157880)