कर्मयोगी कारखान्याने तालुक्यात 300 कोटींची उलाढाल : पुढच्या वर्षी 15 लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने इंदापूर तालुक्यात 11 लाख टन ऊस गाळप करून 300 कोटींची उलाढाल केली असुन, पुढच्या वर्षी 15 लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे मत माजीमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडीच्या वतीने कर्मयोगी परिवार संवाद अभियानाचे आयोजन करण्यात आले असून शिरसोडी येथील सभेत श्री.पाटील बोलत होते.

श्री.पाटील पुढे म्हणाले की,’ गळीत हंगाम सुरू करतानाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहता सुरुवातीला अनेक प्रश्न, अनेक अडचणी होत्या मात्र यातून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने मार्गक्रमण करीत आज पर्यंत 11 लाख टन उसाचे गाळप करून त्यांची पेमेंट केली आहेत. इंदापूर तालुका स्वाभिमानाने राजकारण करणारा तालुका आहे. नीरा भीमा सहकारी साखर कारखाना आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील 22000 एकरांची ऊसतोड झाली आहे. दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. साखर कारखानासंदर्भात 9800 कोटी रुपये इतका इन्कम टॅक्स माफ करण्याचा धडाडीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतला. सभासद शेतकर्‍यांनी उसाच्या नोंदी वेळेत द्यावेत. ऊस उत्पादकता वाढविण्यासंदर्भात कर्मयोगी कारखान्याच्या माध्यमातून विविध उपाय योजनेसह कार्यक्रम राबविण्यात येईल.’

यावेळी भाऊसाहेब चोरमले ,राजेंद्र पवार, बळीकाका बोंगाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, अँड. कृष्णाजी यादव, अतुल व्यवहारे, पराग जाधव, अशोक इजगुडे, रघुनाथ राऊत, राजेंद्र चोरमले, बाबूराव पाडुळे, नारायण व्यवहारे, देविदास सातव, महेंद्र रेडके, सतीश व्यवहारे, कुबेर पवार तसेच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.

शिरसोडी, पडस्थळ, पिंपरी, आजोती, सुगाव, माळवाडी नंबर 1, नरुटवाडी, कालठण नं. 2, वनगळी, गलांडवाडी नंबर 1 येथील शेतकरी मोठ्या संख्येने शिरसोडी येथील कर्मयोगी परिवार संवाद अभियानास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!