आपत्य नसलेल्या निराश पालकांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी इंदापूर मध्ये शिवदीप नर्सिंगच्या माध्यमातून होणार नवीन टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची सुरुवात…

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): अपत्य नसणार्‍या निराश पालकांवर उपचार करण्यासाठी देशभरातील अनेक शहरांत टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु झाल्यानंतर आता इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच शिवदीप नर्सिंग होम च्या माध्यमातून टेस्ट ट्यूब बेबी या केंद्राची सुरुवात होणार आहे. या केंद्राचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार झाले.

इंदापुरमध्ये नव्याने सुरू होत असलेले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर (आय.व्ही.एफ.) इंदापूर तालुक्यातील पहिले आणि एकमेव होणार असून याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे आधुनिक उपचार, तंत्रज्ञानयुक्त पद्धतीने होणार आहे.

सदर केंद्र शिवदीप नर्सिंग होम, जुना कचेरी रोड, बारामती बँकेजवळ इंदापूर येथे सुरू होणार असून आपत्य नसलेल्या निराश पालकांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी तसेच त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या उद्देशाने केंद्राची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती डॉ.शिवाजीराव खबाले व डॉ.दिपाली खबाले यांनी दिली आहे.

सदर टेस्ट बेबी सेंटर मधील तज्ज्ञ डॉक्टर अपत्य नसलेल्या पालका वरती आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतीने उपचार करणार आहे, अशी माहिती डॉ.दिपाली खबाले यांनी दिली आहे. त्या पुढे म्हणाल्या की कमी खर्चात उपचार करून जागतिक पातळीवरील उपचार पद्धतीचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती डॉ खबाले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!