अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): तालुक्यात सध्या राजकीय घोडदौड सुरू असलेली दिसत आहे. तालुक्याचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विकास कामाचा झपाटा पाहता, इंदापूरचा चेहरा-मोहरा बदलून टाकलेला आहे. त्यामध्ये माजी जि.प.सदस्य श्रीमंत ढोले, सभापती स्वाती शेंडे सारख्या दिग्गजांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची वाट धरली असता आनंद शिगेला पोहचला त्यातच इंदापूरचे युवा नेते दीपक जाधव पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाल्याने आणखीन दुग्दशर्करा योग राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पारड्यात पडल्याने इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे आणखीन वजन वाढल्याचे दिसत आहे.
येत्या तीन तारखेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सभापती स्वाती शेंडे सह इंदापूर तालुक्यातील युवा नेते व पूर्वीचे राष्ट्रवादीचे दीपक जाधव हे सुद्धा प्रवेश करणार आहेत.