गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शपथविधी कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): गोवा हे देशातील सर्वात लहान राज्यांपैकी एक असले तरी पर्यटन क्षेत्रासाठी ते महत्त्वाचे आहे. अशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची दुसर्‍यांदा शपथ प्रमोद सावंत यांनी घेतली.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा शपथविधी कार्यक्रम झाला. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत गोवा विधानसभेच्या प्रचारात सहभागी झाले होते यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे केली नागरिकांशी संवाद साधला. हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले घवघवीत यश हे पुढील निवडणुकीसाठी नांदी ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!