2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे 30 ते 35 हजार मतांनी कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार – श्रीमंत ढोले

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): येणार्‍या 2024 च्या इंदापूर विधानसभेच्या निवडणूकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे 30 ते 35 हजार मतांनी कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक व विश्वासू मानले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केले.

आज दिनांक 29 मार्च रोजी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने इंदापूर मधील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी छोटेखानी वाढदिवसाचे आयोजन केले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री.ढोले बोलत होते.

पुढे श्री.ढोले म्हणाले की, आपला संपूर्ण इंदापूर तालुका राष्ट्रवादीमय करण्यासाठी मी सदैव कटीबद्ध राहीन. उपस्थितांना आवाहन करताना ते म्हणाले की, येणार्‍या 3 तारखेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेश व शेतकरी मेळाव्यास लाखेवाडी येथे उपस्थित रहावे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मधुकर भरणे, राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, मा. पंचायत समिती सभापती प्रशांत पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नवनाथ रुपनवर, बाळासाहेब करगळ, दत्तात्रय घोगरे, गफुरभाई सय्यद, युवक अध्यक्ष ड.शुभम निंबाळकर,संजय देवकर, वसीम बागवान, सचिन खामगळ, सुभाष डरंगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!