अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): निदंणाचं घर असावे शेजारी याप्रमाणे काही विरोधक थापांचा पाऊस पाडण्यात माहीर आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर तालुक्यामध्ये थापांचा पाऊस नव्हे, निवडणूकीचा मोसमी पाऊस सुद्धा नव्हे तर डोळ्याने दिसणारा विकासकामांचा पाऊस पाडला आहे व कोट्यावधी रूपयांची कामे मंजूर केली आहेत.
या विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा 27 मार्च 2022 रोजी दु.1 वा. गिरवी याठिकाणी होणार आहे. यामध्ये रेडा- रेडणी रस्ता 3 कोटी रुपये, वरकुटे- काटी- निरा भीमा साखर कारखाना 6 कोटी 21 लाख रुपये, काटी ओढ्यावरील फुल 1 कोटी व इतर विकास कामे तसेच गिरवी येथील 5 कोटी 63 लाख रुपयांच्या विकास कामे होणार आहेत.

या कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्यानंतर याच ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता काटी या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप पाटील, प्रवीण माने, अभिजीत तांबिले, प्रशांत पाटील, हनुमंत कोकाटे, सचिन सपकाळ, अतुल झगडे, शुभम निंबाळकर, छायाताई पडसळकर हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन मौजे काटी व गिरवी येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संचालक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.