बारामती(वार्ताहर): भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या वतीने भिगवण चौक याठिकाणी छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर प्रसंगी बारामतीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भजन शक्ती सेना याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत खंडाळे, तैनूर शेख, तानाजी पाथरकर, स्वप्निल कांबळे, सुरज देवकाते, भाजप नेते शहाजी कदम, भाजप नेते नितीन भामे व इतर सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रथमच भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्यावतीने अभिजीत पवार, भाजपाचे युवा नेते मुकेश वाघेला, शैलेश खरात, गणेश शेवाळे यांच्या वतीने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी पाथरकर यांनी केले.