बारामती (वार्ताहर): शिवजयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे पूजन, बाल शिवाजी यांचा भव्य पाळणा व मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराबरोबर शिवजयंतीच्या पूर्वसंधेला हनुमंत पाटील यांच्या उपस्थितीत कसबा शिवाजी उद्यानामध्ये असंख्य पणत्या लावून हीच आमची दिवाळी म्हणून शिवाज्ञा प्रतिष्ठान बारामती व विशाल पाटील मित्र परिवार यांच्या वतीने शिवजन्मोत्सव आनंदात साजरा करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन विद्या प्रतिष्ठानचे सदस्य युगेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असंख्य कार्यकर्ते, नगरसेवक व व्यापारी वर्गाने उपस्थिती दर्शविली. युगेंद्र पवार यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुकही केले.

आरोग्य तपासणी शिबिरात सर्वसामान्य नागरिकांना संपूर्ण शरीर तपासणी मोफत उपलब्ध करुन देण्यात आली होती.
तसेच कान तपासणी, दात तपासणी, शुगर-बीपी तपासणी, डोळे तपासणी, रक्त तपासणी व मोफत ईसीजी अशा विविध सेवा यावेळी देण्यात आल्या. गरजू नागरीकांनी या शिबीराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयुर्वेदिक रोपांचे व हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आला. तर महिलांना सॅनिटरी पॅड्स व हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी लाईट शो चे आयोजन करण्यात आले होते. असंख्य शिवभक्तांनी या लाईट-शोचा आनंद लुटला.

या सर्व कार्यक्रमाला हेमंत नवसारे, जगनाथ जगताप, ऍड. सौ.सुप्रिया बर्गे, यशश्री फाउंडेशन बारामती, उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य लाभले.
मंडळाची कार्यकारणी सदस्य अध्यक्ष – किरण पवार, उत्सव प्रमुख – वैभव मोरे, चैतन्य सोनवणे , साहिल आत्तार, श्रीराज दुधाळ, समीर गटगीळे, शुभम पंडित, अखिलेश गलांडे, राहुल धोत्रे, रोहन आंधळकर, संकल्प डिसले, अंकित शितोळे, ओंकार चांदगुडे, संस्थापक अध्यक्ष -विशाल पाटील व असंख्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला .