इंग्रजी अध्ययन समृध्दी तालुका स्तरीय स्पर्धेत कु.स्वराली काशिद प्रथम

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंग्रजी अध्ययन समृद्धी तालुका स्तरीय झालेल्या स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा गोतोंडीची कु.स्वराली सोमनाथ काशिद हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

जि.प.शाळेत ग्रामपंचायत गोतोंडी व शाळा व्यवस्थापन समिती गोतोंडी तर्फे गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच परशुराम जाधव, माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष गहरिभाऊ खाडे, अनिल खराडे, किशोर कांबळे, ग्रामपंचायत व व्यवस्थापन समिती सदस्य यशवंत पाटील, अशोक घोडके, आबा मारकड इ. मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

पुणे जिल्ह्यातील खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी पुणे जिल्हा परिषदेतर्फे दहा कलमी कार्यक्रमापैकी एका कार्यक्रमाची अंमलबजावणी जि.प.शाळा गोतोंडी याठिकाणी करण्यात आली. भविष्यात शालेय विद्यार्थ्यांना याचा उपयोग स्पर्धा परिक्षांसाठी होऊ शकेल.

यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी काशिद हिचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!