अशोक घोडके यांजकडून..
इंदापूर(वार्ताहर): आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी अनेक प्राणाबरोबर कुटुंबे देखील वाचवली, अशा महान कोरोना योध्यांचा सन्मान बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला होता.
दि.22 मार्च 2022 इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. पांडुरंग रायते यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य बी.एम.पी.चे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
गेल्या दोन वर्षांत कोरोनाने आहाहाकर केला होता, रक्ताची नातिदेखील परकी झाली होती. अशावेळेस बर्याच लोकांना आपले कोण व परके कोण याची अनुभूती आली होती. अशातच सामाजिक कार्याने प्रेरित झालेली माणसांनी आपले अखंड कार्य अविरतपणे चालू ठेवले. आणि माणुसकीचे दर्शन घडविले.
यावेळी देशातील ओ.बी.सी जनगणना, ई.व्ही.एम. मशीन संदर्भात व केंद्र सरकारने विविध कायदे कोरोना काळात पास केले आदी सर्व विषयांवर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा दरम्यान अनेक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आले.
कल्पना भोर (लायन्स क्लब अध्यक्षा)
रोहिणी राऊत (अध्यक्षा समीक्षा बहुउद्देशीय सामाजिक संस्था)
अनिता खरात (अध्यक्षा तेज पृथ्वी ग्रुप)
आण्णा पवार (सामाजिक कार्यकर्ते)
धरमचंद लोढा (अध्यक्ष युवा क्रांती प्रतिष्ठाण)
शुभम पवार (अध्यक्ष शिवशंभो प्रतिष्ठाण)
संदिप वाशिंबेकर (अध्यक्ष के धनंजय (बापू) वाशिबेकर चॅरीटेबल ट्रस्ट व शिवा ग्रुप)
अंकुश (ब्रदर्स) (सरकारी कर्मचारी)
रमेशआबा शिंदे (राष्ट्रसेवा दल सामाजिक कार्यकर्ते)
राहुल गुंडेकर (अध्यक्ष मराठा सेवा संघ इंदापूर शहर)
प्रशांत उबरे (सामाजिक कार्यकर्ते)
रमेश दुले (ऍब्युलन्स)
यांना कोरोना योद्धा म्हणून सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रमाचा समारोप प्रकाश पवार यांनी केला.