बारामती(वार्ताहर): दरवर्षी मोठ्या जल्लोषात व विधायक उपक्रमाने मेनरोड बारामती याठिकाणी राजे ग्रुप शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते.
यावर्षी समितीने डोळ्याचं पारणं फिटेल अशी मंडप डेकोरेटर्स करण्यात आली होती. येणार्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महालात प्रवेश केल्याप्रमाणे वाटत होते. प्रत्येक कमानीवर बाजीप्रभु देशपांडे सारख्या वीरांचे छायाचित्र लावून इतिहास सर्वांसमोर ठेवला आहे.

या समितीचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम व त्यांच्या सर्व सहकार्यांनी हा उत्सव साजरा करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
सकाळी प्रतिमेचे पूजन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी इ. मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीचे स्वागत या समितीने मोठ्या हर्ष, उल्हासात केले व मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवभक्तांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.