शिवराज्य प्रतिष्ठानने शौर्याची गाथा सांगणारा हालता देखावा करून इतिहास जागा केला : देखाव्याचे सर्वत्र कौतुक

बारामती(वार्ताहर): येथील शिवराज्य प्रतिष्ठानने वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर फुलाजीप्रभु देशपांडे, वीर रायाजी बांदल, वीर कोयाजी बांदल, वीर शिवा काशीद व बांदल सेनेच्या शौर्याची गाथा सांगणारा पावनखिंडचा हालता देखावा सादर करून इतिहास जागा केला. या देखाव्याचे सर्वस्तरातून कौतुक होत होते.

दरवर्षी शिवराज्य प्रतिष्ठानतर्फे अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. दरम्यान विद्या प्रतिष्ठानचे सदस्य युगेंद्र पवार यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विश्वास देवकाते, सुभाष सोमाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, बबलू देशमुख, गणेश गायकवाड, ऍड.सुधीर पाटसकर, प्रकाश पळसे, पराग साळवी, राहुल जाधव राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

शिवराज्य प्रतिष्ठानचे श्रीकांत जाधव, निलेश गायकवाड, चेतन (मुन्ना) जाधव, अतिश गायकवाड, प्रशांत जगताप, सौरभ राठोड, प्रथमेश गायकवाड, सुमित शिकारे, केदार माळवे, गौरव जाधव, चेतन बा.जाधव, सोनु बामणे इ. आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!