बारामती(वार्ताहर): प्रतिक जोजारे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या सर्व धर्म समभाव समितीतर्फे गुनवडी चौकात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भव्य-दिव्य निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना बिस्लरी पाणी वाटप करण्यात आले.
सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. येणार्या प्रत्येक मान्यवरांना फेटा बांधण्यात आला. सर्व धर्म समभाव समितीचे अध्यक्ष मोहिन शेख, उपाध्यक्ष चैतन्य गालिंदे, कार्याध्यक्ष आक्रम बागवान, सचिव सुरज ओव्हाळ, खजिनदार रोहित साळुंके, सह.खजिनदार केदार पाटोळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.
या समितीचे सल्लागार गणेश गालिंदे, योगेशभैय्या महाडीक, सचिन(बल्ली) सोनवणे, वसीम शेख व आदिल तांबोळी हे आहेत. बारामती येथील सुप्रसिद्ध जोजारे सराफचे प्रोप्रा.गणेश जोजारे हे आधारस्तंभ आहेत.
बारामतीतील समाज कार्याची आवड असणार्या सर्व धर्मातील युवकांनी एकत्र येत सर्व धर्म समभाव समितीची स्थापना करत शिवाजी महाराजांची 392 वी जयंती एक सामाजिक संदेश देणारी साजरी केली. शिवरायांनी सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्याच स्वराज्याचे आताच्या धर्मप्रदूषित वातावरणात सुराज्य उभारण्यासाठी युवकांनी उचललेले पाऊल निश्र्चित एकात्मतेचा संदेश देणारे आहे.
येणार्या काळात विविध थोर पुरूषांच्या जयंती उत्सव सर्व धर्म समभाव समितीतर्फे साजरी करण्यात येणार असल्याचे समितीतर्फे यावेळी सांगण्यात आले.