बारामती(वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराज जयंतिनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विशाल जाधव यांच्या प्रयत्नातून देसाई इस्टेट शिवजयंतीनिमित्त लोकपयोगी आरोग्य शिबीराचे आयोजन करून स्तुत्य उपक्रमाने साजरी करण्यात आली. 470 लाभार्थ्यांनी डोळे तपासणी, डायबेटीझ, थायराईड, कोलोस्ट्राल इ. मोफत तपासणी करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.
या शिबीराचे उद्घाटन बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे स्विय्य सहाय्यक हनुमंत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, मा.नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे , सम्यक छाजेड, मा.नगरसेवक सुरज सातव, मा.नगरसेविका आरती शेंडगे इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी सचिन मोरे, प्रविण बोरा, सुरेश झगडे, शंकर घोडे, कासिम शेख, नितीन मोरे, राहुल नाळे, शाम शेवाळे, पप्पु शेवाळे, रविंद्र वाडते, सुनिल कदम, दत्तात्रय जाधव, धनु आटोळे, कुंदन आवळे, सागर मोहीते, धनसिंग घाडगे, हर्ष बोरा, ओंकार लाळगे,मनोज नाळे, विवेक भंडारे, देवेश बोरा, हिमांशु गालिंदे, स्वप्निल दिवटे, समाधान देवरे, पार्थ भंडारे, अक्षद शहाणे, अविनाश कांबळे, निशांत शेंडगे, नेहाल दामोदरे, पापा शेख, अभिषेक गजाकस, मंगेश खांडेकर, कल्याण गावडे, दादासो गावडे, अतुल पवार इ. अनेक कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.