बारामती(वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीन यांच्या सहयोगाने बारामती हॉस्पिटल प्रा. लि.बारामती येथे किमोथेरपी युनिटचे उद्घाटन गुरुवार दिनांक 17 मार्च 2022 रोजी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी रोटरी डिस्टिक 3131 चे प्रांतपाल रो.पंकज शहा, मागील वर्षाचे प्रांतपाल रो.रश्मी कुलकर्णी या प्रोजेक्टचे समन्वय रो.सुदिन आपटे, असि. गव्हर्नर रो.ज्ञानेश्वर डोंबाळे तसेच या प्रकल्पास सढळ हाताने देणगी देणारे स्व. सौ. सीमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम जाधव व रो. मंगेश हांडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी देणगीदार व उपस्थितांचे स्वागत बारामती हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या वतीने करण्यात आले.
हा प्रकल्प रोटरी ग्लोबल रॉड अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिंस्टीन व इतर 9 क्लब यांच्या मार्फत पुणे व रायगड जिल्हयातील ग्रामीण भागात अशी 8 युनिट्स उभारण्यात आली आहेत.
या कार्यक्रमासाठी बारामती हॉस्पिटल प्रा लि चे संचालक मंडळ व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बारामती यांचे अध्यक्ष रो.संजय दुधाळ, उपाध्यक्ष रो.अलीअसगर बारामतीवाला सेक्रेटरी रो.रविकिरण खारतोडे, खजिनदार रो. पावेंद्र फरसोले, रो. प्रतिक दोशी, रो.डॉ.प्रा. हनमंतराव पाटील, रो.दत्तात्रय बोराडे, रो.महावीर शहा, रो.किशोर मेहता, रो.कौशल सराफ, रो.हर्षवर्धन पाटील, रो.अतुल गांधी, रो.निखिल मुथा, रो.स्वप्निल मुथा, रो.अजय दरेकर, रो.अरविंद गरगटे आणि रो.सौ.जयश्री पाटील उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ बारामती यांच्या विशेष प्रयत्नातून हा प्रकल्प बारामती, दौंड, इंदापूर, भिगवण, फलटण या क्षेत्रातील कॅन्सर पीडित रुग्णांसाठी माफक दरामध्ये कीमोथेरेपी वॉर्ड ची सुविधा उपलब्ध केल्यामुळे रुग्ण समाधान व्यक्त करत आहे. तसेच बारामती हॉस्पिटल प्रा लि यांना रोटरी क्लब ऑफ बारामती यांनी एक डायलेसिस युनिट दिलेले आहे. आणि भविष्यामध्ये रोटरी क्लब ऑफ बारामती यांच्या माध्यमातून आधुनिक वैद्यकीय सुविधा बारामती हॉस्पिटल प्रा लि यांचे सोबत सुरु करीत आहोत. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष रो. संजय दुधाळ यांनी दिली.