बारामती(वार्ताहर): बारामती शहरात हिंदू तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव समिती आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे कोणताही सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. यावेळेस निर्बंध शिथिल झाल्याने शिवप्रेमीनी जल्लोषात जयंती साजरी केली असुन शहरात भगवे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्रपती शिवाजी उद्यान येथे मान्यवरांच्या हस्ते शिवपुजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिलआण्णा शिंदे, बारामती बँकचे चेअरमन सचिन सातव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बा.न.प. मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, मनसे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सुधीर पाटसकर, हेमंत नवसारे, इम्तियाज शिकलकर, सौ.कल्पना जाधव, दिलीप ढवाण, अमर धुमाळ, देवेंद्र शिर्के, प्रदीप शिंदे, दिलीप शिंदे, सूरज सातव, साधु बल्लाळ, दीपक मालगुंडे, छगन आटोळे, संजय किर्वे, ऍड.जी.बी.आण्णा गावडे, सुनील कदम, सुरज सातव, सुनिल सस्ते, उमेश दुबे, बबन पारख, जितेंद्र जाधव, संभाजी माने, जब्बार पठाण,राकेश सावंत, लक्ष्मण मोरे, दिलीप ढवाण, इ.मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी शहरातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक उंट, घोडे, पारंपरिक नृत्य पथके, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. चौका-चौकात विविध मंडळांनी या भव्य-दिव्य निघालेल्या मिरवणुकीचे स्वागत केले.