30 मार्चला राज्यस्तरीय युवा सोलो डान्स स्पर्धा

बारामती(वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि.30 मार्च 2022 रोजी भव्य राज्यस्तरीय युवा सोलो डान्स स्पर्धा-2022चे आयोजन जिजामाता भवन, भिगवण रोड, बारामती याठिकाणी करण्यात आले असल्याचे आयोजक रोहन मागाडे (ठज) व अनिकेत मोहिते यांनी कळविले आहे.

स्पर्धेला प्रवेश फी 300 आहे. संध्याकाळी 5 ते 10 यावेळेत स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेला 15 हजाराचे प्रथक क्रमांकाचे पारितोषिक माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी दिले आहे. द्वितीय 10 हजार पोपट उगाडे, तृतीय 7 हजार पिंटू गायकवाड तर चतुर्थ क्रमांक 3 हजार देवांश गाडे यांनी दिले आहे. अधिक माहितीसाठी रोहन-9923807771, महेश-9700140101, विकास-9922919939, सिद्धार्थ-7066195102 यांच्या संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!