बारामती(वार्ताहर): येथील साहस ऍडवेंचर्सतर्फे सांधन व्हॅल्ली ट्रेकचे आयोजन 25 ते 27 मार्च 2022 रोजी करण्यात आले आहे. साहस ऍडवेंचर्स ही नागरीकांमध्ये धाडसीवृत्ती व आत्मविश्र्वास वाढावा म्हणून वेगवेगळ्या ट्रेकचे आयोजन करीत आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांधन व्हॅल्ली ट्रेकचे आयोजन केले आहे.
शुक्रवारी दि.25 मार्च रोजी रात्री ठिक 9 वाजता नटराज नाट्य कला मंडळ, भिगवण रोड बारामती याठिकाणाहून दि.25 मार्च रोजी रात्री 9 वा. प्रस्थान होणार आहे. रविवार दि.27 मार्च रोजी रात्री साधारण 10 वाजे पर्यत पुन्हा बारामतीत येणार आहे.
या ट्रेकचे खास आकर्षण म्हणजे टेन्ट स्टे, रॅपलिंग आणि चुलीवरचे जेवन असणार आहे. सोबत अनुभवी प्रशिक्षक, सुरक्षेचे साहित्य, प्रथमोपचार पेटी, लोकल गाईड असणार आहेत. अधिक माहितीसाठी सचिन आगवणे-9623988585, अजित जंगम-9890157619, राहुल शहा-9960979277, सागर जाधव-9404684808, सागर हिंगमिरे (पुणे)- 9545514668 यांच्याशी संपर्क साधावा.