अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या यशाबद्दल यांची समक्ष भेट घेऊन त्यांनी अभिनंदन केले.
नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणुकीमध्ये मोठे यश संपादन केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवली होती या निवडणुकीत पक्षाला मोठे यश संपादन करता आले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ गोव्यातील जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाला आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. भाजपने राबवलेल्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. भाजपचा हा विजय येणार्या पुढच्या निवडणुकीसाठी नांदी ठरेल.’