अशोक घोडके यांजकडून
इंदापूर(वार्ताहर): भिगवण येथील पल्लवी सोनोने दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहोचली आहे. पल्लवी सोनोने टीव्ही अभिनेत्रीला महिला दिनाचे औचित्य साधून भारत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या वतीने वूमन सिनेमा अँड आर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
इंदापूर येथे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी आज पल्लवी सोनोने यांचा सत्कार करून त्यांचा यथोचित सन्मान केला. सर्वसामान्य कुटुंबातील पल्लवी सोनोने हिने कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली असून इंदापूर तालुक्यासाठी हा मोठा अभिमान असल्याचे यावेळी अंकिता पाटील-ठाकरे यांनी म्हटले.