कोणावर अन्याय करू नका व कार्यकर्ता कसा घडवायचा हे कर्मयोगी भाऊ व आ.गणपतराव पाटील यांच्याकडून शिकायला मिळाले – राज्यमंत्री, दत्तात्रय भरणे.

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): कर्मयोगी शंकररावभाऊ यांनी आयुष्यात एखादे काम नाही झाले तरी चालेल पण काम करताना कोणावर अन्याय करु नका तर कै.आ.गणपतराव पाटील यांनी कार्यकर्त्याला कसे सांभाळायचे, कार्यकर्ता कसा घडवायचा हे सर्व या मंडळींकडून आयुष्यात खूप शिकायला मिळाले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शनिवारी दि.19 मार्च रोजी तावशी येथे कोटी लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपुजन संपन्न झाला. त्यानंतर जाहिर सभेत इंदापूर तालुक्याच्या जडणघडणेत कर्मयोगी भाऊ, आ.गणपतराव पाटील व राजेंद्र घोलप तात्यांनी आयुष्य वेचले त्यांच्या आठवणींना जाहिर सभेत उजाळा देत ना.भरणे बोलत होते.

पुढे बोलताना ना.भरणे म्हणलो की, तालुक्यातील या जेष्ठ मंडळीकडून आम्हाला खूप काही मिळालं. आज ही मंडळी आपल्यात नसली तरी त्याच्या आठवणी कायम आहेत. एखाद्याच्या मनाता एखादा कार्यकर्ता नाही म्हणत असेल तर त्याला होय कसं करायचं, त्याच्या गळी कसं उतरायचं हे के घोलप साहेबांकडून आमच्या सारखा कार्यकर्ता शिकला. शेवटी आयुष्यात काय असते? या थोर विचारवंतांचे मार्गदर्शन घ्यायचे असते त्यांचे काम, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करायचे असते. आणि माझे शेवटचे राहिले प्रशासनाकडून काम कसे करुन घ्यायचं हे मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांकडून शिकायला मिळाले असे ते म्हणाले.

आपल्या राजकारणाची सुरवात कशी झाली आणि आपण कसे घडत गेलो याचे अनेक किस्से सांगत असताना भरणे यानी तालुक्यातील या विचारवंतांच्या आठवणी जाग्या केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!