अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): मला इंदापूर तालुक्याचा आमदार, मंत्री होण्यासाठी गोरगरीब नागरीकांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
चाकाटी येथील 14 कोटी 38 लाख निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन भरणे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, युवक नेते नवनाथ रुपनवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे,महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष उमाताई पडसळकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,संजय देवकर,सुरेश शिंदे,सुभाष पाटील,सरपंच संजय रुपनवर,उपसरपंच शुभांगी वडापुरी,पोलीस पाटील भारत मारकड,केशव मारकड, नवनाथ पाटील,बापू हांडे,विजय मारकड,आप्पासाहेब मारकड यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व चाकाटी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे ना.भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील चाकाटी परिसराच्या विकासासाठी हवा तितका निधी दिला जाईल. या परिसराचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे नागरिकांनी उभे राहावे असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
नवनाथ रुपनवर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विभागाच्या भरघोस निधी मिळाला असून आगामी राहिलेल्या उर्वरित कामांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून निधी मिळणार आहे त्यामुळे येथील जनता कायम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराची नाव कधीही तोडू देणार नाही.