अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.संतोष खामकर यांची नियुक्ती झालेबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष (पीजेपी) च्या वतीने त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रहार जनसंघर्षाचा, आधार जनसामान्यांचा या ब्रीद वाक्याप्रमाणे प्रहार जनशक्ती पक्ष सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्र्न मांडून मार्गी लावीत आहे. या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश तथा बच्चू कडू आहेत. कोणाचीही भिडभाड न ठेवता प्रहार जनआंदोलनाचा विचार लोकविकासाचा याप्रमाणे तळागाळातील लोकांकरीता काम केले आहे व करीत आहेत.
याच उद्देशाने सर्वसामन्य, गोर-गरीबांना उपजिल्हा रूग्णालय हा भावनिक आधार म्हणून पाहिले जाते. अशा ठिकाणी गोर-गरीबांना आधार देणारे डॉ.संतोष खामकर यांची नियुक्ती झाल्याने सर्वसामान्य नागरी आनंद व्यक्त करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी ज्याप्रमाणे रूग्णांची दर्जेदार सेवा केली यापुढेही ते अशीच करतील याच शंका नाही. त्यांच्या कार्याला शुभेच्छा व प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष विशाल कांबळे, दादा कांबळे, चेतन सोणवणे, प्रतिक बिबे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.