अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेस इंदापूर तालुका सरचिटणीसपदी नानासाहेब मोहन भोईटे तर संघटकपदी नूरमहंमद मौला शेख यांची पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यानंी नियुक्ती पत्र देवून निवड केलेली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विकासाचा सपाटा लावलेला आहे. सदरचा विकास व पक्षाची ध्येय धोरणे तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाचा विस्तार करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना नवनियुक्त पदाधिकारी म्हणाले की, आम्हा सर्वांचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रियाताई सुळे, विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अधिक बळकट व सक्षम करत पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे आम्ही पार पाडू असे म्हणाले.
यावेळी छायाताई पडसळकर, रमेश पाटील, प्रफुल्ल पवार, चंद्रकांत गलांडे-पाटिल, अशोक घोडके, सुनिल मोहिते-पाटिल,समाधान बोडके, अक्षय कोकाटे, संजय देवकर, विठ्ठल महाडिक, सुखदेव निकम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.