विद्यानगरी(वार्ताहर): विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयीन विद्यार्थी व पोलीस भरती मार्गदर्शन केंद्रातील प्रशिक्षणार्थींना उपविभागीय पोलीस अधिकारी अंतर्गत निर्भया पथकातील पोलीस अधिकार्यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयीन विद्यार्थी व पोलीस भरती केंद्रातील सृजन सोशल वेल्फेअर फाउंडेशन बारामती यांच्या माध्यमातून निर्भया पथक मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्यात आला होता.
या कार्यक्रमाला विद्या प्रतिष्ठानचे प्राचार्य भरत शिंदे, स्पर्धा परीक्षा समन्वयक सुनील ओगले, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे निर्भया पथकातील बारामती तालुका पोलिस स्टेशनचे महिला पोलीस हवालदार दीपा मोरे, बारामती शहर पोलीस स्टेशन पो.कॉ.सोमनाथ कांबळे, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन महिला पो.कॉ. माया भोईटे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी सोमनाथ कांबळे यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात कोणती कलमे असतात हे सांगितले. दीपा मोरे यांनी विद्यार्थिनींना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्याचे परिणाम पुढे काय होतात याची जाणीव करून दिली. भोईटे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी व प्रसंगाची विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात फोफावत असलेली विकृती यामुळे भेडसावत असलेल्या समस्या या अनुषंगाने या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांकडून कोणत्याही मुलींची छेड काढली जाऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केलं जाऊ नये.
मार्गदर्शन समाजामध्ये स्त्रियांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या पोलिस पथकातील निर्भया पथक स्थापन केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे समन्वयक विशाल भोसले यांनी केले तर अतिथींचे सत्कार शारीरिक प्रशिक्षक विशाल चव्हाण यांनी केला. या कार्यक्रमाची सांगता सोमनाथ कांबळे यांनी केली या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.