शिर्सुफळ(वार्ताहर): येथील भारतीय बौद्ध महासभा संरक्षण उपाध्यक्ष राजु सुदाम मोरे यांच्या मातोश्री राहीबाई सुदाम मोरे (वय-70) यांचे दि.19 फेब्रुवारी 2022 रोजी रेल्वे रूळ ओलांडताना अपघाती निधन झाले. राहीबाई प्रेमळ, मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने मोरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंतविधी समयी समता सैनिक दलाने सलामी दिली. यावेळी बौद्धमहासभेचे जिल्ह्याचे अध्यक्ष रघुनाथ साळवे, पालकमंत्री सुजाता ओव्हाळ, सरदार गुरूजी, कांबळे गुरूजी, बारामती कार्यकारिणी अध्यक्ष बापूराव लोंढे इ. श्रद्धांजली वाहिली.