बारामती(वार्ताहर): दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा बारामती तालुक्याच्या वतीने दि.19 व 20 फेब्रुवारी 2022 रोजी समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आज शिबिराचा समारोप झाला यावेळी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष रघुनाथ साळवे तसेच शिबीरास प्रशिक्षक म्हणून आद. सि.डि. ऑफिसर सुधाकर सरदार व सि.डि. ऑफिसर सुभाष कांबळे व पुणे जिल्हा पूर्व संरक्षण उपाध्यक्ष आद.अनिल सोनवणे तसेच या लेफ.जनरल आद. दादासाहेब भोसले यांनी शिबीरार्थी ना समता सैनिक दलाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.
या शिबिरास दौंड तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण मोरे उर्फ सुमेध मोर्य यांनी भेट दिली. सदर कार्यक्रमाच्या वेळी भारतीय बौद्ध महासभा बारामती तालुका अध्यक्ष बापूराव लोंढे व कोषाध्यक्ष भारत लोंढे, सरचिटणीस ऍड.किशोर मोरे, संस्कार उपाध्यक्ष गोरख कांबळे, पर्यटन उपाध्यक्ष बाळु लोंढे, महिला उपाध्यक्ष रत्नमाला लोंढे, महीला सचिव अस्मिता शिंदे तसेच कंपनी कमांडर पुण्यशील लोंढे, संरक्षण सचिव श्रीयश लोंढे, क्षितीज कांबळे, सैनिक नवनाथ पवार, भारतीय बौद्ध महासभा बारामती तालुका सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शिबीराचे सूत्रसंचालन ऍड.किशोर मोरे यांनी केले. शिबिरात शिबिरार्थींनी मनोगत व्यक्त केले. येणार्या दिवसात मोठ्या प्रमाणात समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर आयोजित करून जास्तीत जास्त सैनिक निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शेवटी आभार कंपनी कमांडर व कार्या. सचिव पुण्यशील लोंढे यांनी मानले व सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.