शिवजयंतीनिमित्त शिवसेना महिला आघाडीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

सोमेश्र्वर(वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना महिला आघाडीतर्फे 19 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस छत्रपती शिवाजी महाराज व हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना बारामती तालुका प्रमुख विश्वास मांढरे, क्षेत्र प्रमुख निलेश मदने, उपतालुकाप्रमुख सुदाम गायकवाड, विभाग प्रमुख बंटी गायकवाड, वैद्यकीय मदत कक्ष बारामती तालुका समन्वयक सौ.सारिका आटोळे इ. उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्राथमिक शाळा करंजेपुल येथील चिमुकली कु.भापकर हिने छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर हृदयस्पर्शी भाषण केले. ई-श्रम कार्ड वाटप, प्राथमिक शाळेत गरजुंना वह्या वाटप तसेच नवनिर्मित महिलांचा पक्ष प्रवेश अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेना महिला बारामती तालुका संघटक सौ.कल्पना जाधव (काटकर) यांनी केले होते.

यावेळी महिला आघाडी उपतालुका संघटक कलावती युवराज चव्हाण, विभाग संघटक छाया हाजीरगे, उपविभाग संघटक रोहिणी पवार, शाखा संघटक सुनिता मोरे, सौ.संगीता गाढे, सौ.यशोदा केंगार, सौ.संगीता गायकवाड, सौ. कल्पना सूर्यवंशी, सौ.संगीता चौगुले, सौ.कल्पना शिंदे, सौ.सुजाता कदम, सौ. छबु शिरसाट, सौ.संगीता बलखंडे, सौ.वैशाली जाधव, सौ.चव्हाण, सौ.नंदा भजनावळे, सौ.सुमित्रा गायकवाड, सौ.रेखा भारती, सौ.मंगल पाटणकर, सौ. पुष्पा चव्हाण, सौ.गंगु जगताप, सौ.शालन जगताप, सौ.आनंद कोकरे, सौ.पुष्पा बामणे, सौ.उज्वला किरण बामणे, सौ.पद्मा नाना बामणे, सौ.ऐश्वर्या घाडगे, सौ.अंजली अजय गायकवाड, सौ.सुमित्रा अमर निगडे व इतर बारामती महिला आघाडी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर विधानसभा उपसभापती आ.नीलम गोर्‍हे यांची मोरगाव येथे भेट घेतली. सौ.कल्पना जाधव यांनी बारामती तालुका महिला करीत असलेल्या कार्याची संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली. त्यास गोर्‍हे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!