बारामती(वार्ताहर): नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे बारामतीचे सुपूत्र भारत सदाशिव चव्हाण यांना नुकताच राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार दि.27 फेब्रुवारी 2022 रोजी भोसरी, पुणे येथे सिनेअभिनेता जयराज नायर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.दीपक भवर, राष्ट्रीय सचिव सचिन वाघ इ. मान्यवर उपस्थित होते.
यापुर्वी भारत चव्हाण यांना कलाभूषण पुरस्कार, आदर्श सेवा सन्मान कलाभूषण पुरस्कार, कलारत्न सन्मान-2020, राज्यस्तरीय गुणिजन गौरव कलारत्न पुरस्कार 2020 तसेच राष्ट्रीय गुरूडझेप ऍवॉर्ड-2020 असे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. भारत चव्हाण हे शिक्षक असुन त्यांच्या अंगी कला, गुणांचा भांडार आहे. सामाजिक संस्थांनी त्यांच्या कला, गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानीत केले आहे. या मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्व स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.