बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष जय पाटील यांचे गेल्या वीस वर्षापासून वर्चस्व असलेल्या तांदुळवाडी येथील कमला नेहरू विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करून पुन्हा एकदा वर्चस्व अधोरेखीत केले आहे.
कमला नेहरू विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सन 2021-22 ते 2025-26 साठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. 850 सभासद संख्या असलेल्या सोसायटीची निवडणूक जय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडून यंदाही बिनविरोधाची परंपरा कायम राखली. निवडणूक निर्णय अधिकारी एस.एम.काळे यांनी काम पाहिले.
गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून तांदुळवाडी परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. विकास कामांच्या माध्यमातून जय पाटील यांची तांदुळवाडी परिसरातील नागरिकांशी अतुट असे नाते प्रस्थापित झालेले आहेत. त्या अनुषंगाने गेले वीस वर्षांपासून कमला नेहरू विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच कमला नेहरू नावाने तीन पाणी वापर संस्था व अमृत नावाने दोन पाणी वापर संस्था अशा एकूण पाच पाणी वापर संस्थांवर जय पाटील यांचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.
सुरेश बेलदार, दिगंबर बेलदार, अजित बेलदार, कौशल्या एजगर,मनोज बेलदार,पुरुषोत्तम कदम, शुभदा अडागळे,उर्मिला बेलदार, रावबा बेलदार,संपत भोसले,सर्जेराव आबुरे,जय पाटील, श्रीराम पाटील हे बिनविरोध सदस्य झाले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तांदुळवाडी परिसरात विकास कामांची घोडदौड कायम सुरू आहे. विकास कामांच्या माध्यमातून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यास आम्ही पात्र ठरत आहोत. त्यामुळे गेले वीस वर्षांपासून कमला नेहरू विकास सोसायटी तसेच पाच पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून या परिसरातील नागरिक आमच्यासोबत आहेत. -जय पाटील, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बा.न.प.